त्रैवार्षिक पुरुषोत्तम मास महोत्सव - श्री क्षेत्र देवगड

🌿 श्रीमद् भागवत कथा तथा श्री दत्त लक्ष्मी नारायण याग 🌿

सहज सुखासनी अनसूया नंदन। पाहता हे ध्यान वृत्ति निवे ।।

श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरीबाबा बालसंन्यासी यांचे कृपेने श्री दत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र देवगड येथे
।। त्रैवार्षिक पुरुषोत्तम मास निमित्त ।।

श्रीमद् भागवत कथा तसेच श्री दत्त लक्ष्मी नारायण याग व किर्तन महोत्सव संपन्न होत आहे. कृपया भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सत्संगाचा अवश्य लाभ घ्यावा.

श्रीगुरूंचे प्रेम वृद्धिंगत करावे. यारे यारे लहान थोर। याती भलते नारीनर।
करावा विचार । नलगे चिंता कोणासी ।।

🌸 शुभारंभ 🌸

मिती अ. श्रावण शु. ५ शके १९४५

🌸 सांगता 🌸

मिती अ. श्रावण शु. १२ शके १९४५

🕉 दैनिक कार्यक्रम 🕉

पहाटे
  • ३:३० ते ४:०० — सनई वादन
  • ४:०० ते ६:०० — काकडा, श्रींची प्रातः आरती
सकाळी
  • ७:३० ते ८:३० — गीतापाठ, विष्णुसहस्त्रनाम
  • ८:३० ते ११:३० — श्रीमद् भागवत कथा
दुपारी
  • १२:०० ते ३:०० — भोजन
  • ४:०० ते ५:०० — श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरीबाबा अभंगावली निरूपण
रात्री
  • ५:०० ते ७:०० — हरिपाठ, श्रींची सायम् आरती
  • ७:०० ते ८:३० — भोजन
  • ८:३० ते १०:३० — कीर्तन
  • ११:०० ते ४:०० — नेमलेल्या भजनी मंडळाचा जागर

🌺 उपस्थिती 🌺

परिसरातील सर्व संत महंत, सर्व गुणीजन, गायक, वादक यांची उपस्थिती लाभेल. काकडा हरिपाठ श्री गुरुसेवेतील सर्व गायक, वादक, भजनी मंडळ व विद्यार्थी तसेच सर्व पक्षातील सन्माननीय मान्यवर यांचे सदिच्छा भेटी.