गुरु भवन - श्री क्षेत्र देवगड

🙏 गुरु भवन 🙏

“श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांच्या विश्रांती स्थळाची पवित्र अनुभूती.”

श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांची ही पवित्र विश्रांती स्थळ आहे. येथे बाबाजी राहत असत, बसत असत आणि त्यांच्या सर्व वस्तू आजही भक्तिभावाने जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

या स्थळी प्रवेश केल्यावर भक्तांना शांती, स्थैर्य आणि दिव्यतेचा अनुभव मिळतो. हे स्थान म्हणजे बाबाजींच्या उपस्थितीचं सजीव प्रतीक आहे.