आषाढी वारी महोत्सव - श्री क्षेत्र देवगड

|| ते आमुचे कुलदैवत ||

|| पांडुरंग ||

मिती आषाढ शुद्ध ६, शके १९४७
श्री क्षेत्र देवगड संस्थान वरून प्रस्थान

चला पंढरीसी जावू । रखूमा देविवरा पाहू ।।
श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरी चावा वालरसंन्यासी
श्री क्षेत्र देवगड संस्थान आषाढी वारी पालखी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह
श्री क्षेत्र पंढरपूर

।। ॐ नमो सद्‌गुरू जय जय किसनगिरीबाबा ।।

पंढरी क्षेत्रामधील दैनिक कार्यक्रम

सर्व दिवसांच्या कार्यक्रमांत सकाळी ४ ते ६ काकडा, आरती, सकाळी ७ ते ८ गीतापाठ, ९ ते ११ श्री नामदेव गाथा पारायण, दुपारी ३ ते ५ पारायण, सायं. ५.३० ते ७ हरिपाठ, आरती व भोजन, रात्री ८.३० ते १०.३० कीर्तन असे कार्यक्रम होतील.

श्री. ह.भ.प. महंत प्रकाशानंदगिरी महाराज उत्तराधिकारी, श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडेल.

सांगता दिवशी सकाळी ७ ते ९ काल्याचे कीर्तन श्री. ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान) करतील व त्यानंतर आरती होईल.

🌿 व्यासपीठ 🌿

पूर्व सुकृताची गाठोडी पदरी । तरीच पंढरी वास घडे ।।
कोटी यज्ञ फळ भीमरथी पाहता । मोक्ष सायुज्यता तत्क्षणी ।।
पृथ्वीचे दान असंख्य गोदाने । पुंडलीक दरूशने न तुळती ।।
एका जनार्दनी विठ्ठलाचे भेटी । येरझारा तुटी जन्मोजन्मी ।।

पंढरी ऐसे क्षेत्र अद्भुत । आणि पांडुरंगा ऐसे वरीष्ठ दैवत ।।