भक्त निवास - श्री क्षेत्र देवगड

🙏 भक्त निवास 🙏

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक सत्संगासाठी, चिंता विसरण्यासाठी, जीवनाच्या सार्थकतेचे उत्तर शोधण्यासाठी येतात. अशा भाविकांना सुविधा मिळाल्या की त्यांच्या वास्तव्यात सुलभता येते. देवगड संस्थान हे भक्तांच्या गरजेला ओळखणारे आहे — भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याने, त्यांच्या निवास व्यवस्थेची आवश्यकता लक्षात घेऊन या भव्य भक्त निवास इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे.

या ठिकाणी एकाच वेळी १००० भाविकांची राहण्याची सोय होऊ शकेल अशा ७५ खोल्यांचे बांधकाम केले आहे. येथे भोजनगृह, स्वागतकक्ष आणि सत्संग कक्ष देखील उपलब्ध आहे. आता देवगडला येऊन साधनेसाठी, सत्संगासाठी थांबावयाचे असेल तर येथे अत्यंत पवित्र, शांत आणि सर्व सुखसोयींनी युक्त निवासव्यवस्था उपलब्ध आहे.

“भक्त निवास — श्रद्धा, समाधान आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम.”

मंदिर परिसराला सन्मुख असलेली ही वास्तू ‘भक्त निवास’ म्हणून ओळखली जाते. येथील स्वच्छता, सौंदर्य आणि सात्त्विकतेने भारलेले वातावरण प्रत्येक भाविकाच्या मनाला शांती आणि आनंद देते. हे निवासस्थान केवळ विश्रांतीचे ठिकाण नसून, आत्मिक ऊर्जा आणि भक्तीचा अनुभव घेण्याचे स्थान आहे.